देऊळघाट (हॅलो बुलडाणा /इमरान खान) गावातील अवैध देशी दारू विक्री बंद करण्याची मागणी पोलिसांना करून देखील दारू विक्री बंद होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान उस्मान खान यांनी २६ मे पासून ग्रामस्थांसह एसपी ऑफिस समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
रिजवान खान उस्मान खान यांनी
जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, देऊळघाट हे मोठ्या लोकवस्तीचे गाव असून गावातून राज्य महामार्ग जातो. गावात लहान- मोठ्या दुकानांतून राजरोसपणे अवैधरीत्या देशी दारूची विक्री होत आहे. दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून तरुण पिढी व्यसनाधीन झाल्याचे दिसत आहे. गावात १ ते १२ वी पर्यंत शाळा असून देऊळघाट परिसरातील विद्यार्थी – विद्यार्थिनी शिक्षणासाठी येथे येतात त्यांचेकडे पाहून मद्य प्राशन केलेले अनेक तरुण त्यांची छेड काढत असल्याने कोणत्याही क्षणी गावातील कायदा व सुरक्षा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गावात एकही अधिकृत देशी दारू विक्रेतेचे दुकान नसल्याने होत असलेल्या अवैध देशी दारू विक्रीला पोलिस प्रशासनाने रोखावे, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.