spot_img
spot_img

समाज कल्याण कार्यालय ‘रामभरोसे!’ – दिव्यांग लाभार्थी झिझवतात कार्यालयाचे उंबरठे!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभागाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून कर्मचाऱ्यांचा कारभार ढेपाळला आहे.आज २२ मे रोजी ३ ते साडेचार दरम्यान कार्यालयात एकही कर्मचारी हजर नसल्याने दिव्यांग लाभार्थ्यांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागल्याचे चित्र होते.

जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थी आपल्या विविध कामासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयात येत असतात.परंतु समाज कल्याण कार्यालयातच कुणी कर्मचारी दिसून येत नाही.कर्मचारी असले तरी, लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि त्यांची कामे पेंडींग ठेवली जातात,अशी ओरड नेहमीचीच आहे.एकीकडे शासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार देतो मात्र दुसरीकडे अधिकारी, कर्मचारी कर्तव्याबद्दल अनास्था दाखवत असतील तर लाभार्थ्यांना न्याय मिळणार कसा? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!