spot_img
spot_img

💥’ महाराजांना मोकाळा श्वास केव्हा?’ अग्रेसन महाराजांच्या पुतळ्याला अतिक्रमणाचा वेढा! – समाज बांधवात रोष, न.पा. मुग गिळून!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कारंजा चौकातील श्री अग्रेसन महाराज पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटविण्याची मागणी समोर आली आहे.या संदर्भातील निवेदन देखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.परंतु कारवाई होत नसल्याने समाज बांधवात रोष व्यक्त होत आहे.यासंदर्भात नगरपालिकेची ‘तोंडावर बोट हाताची घडी’ अशी भूमिका दिसून येते.

कारंजा चौक येथील अग्रेसन महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला थाटलेले व वाहतूकीला कोंडी निर्माण करणाऱ्या टपरी टाकून केलेले अतिक्रमण तात्काळ हटवावे,अशी तक्रार गौरव राजेश अग्रवाल यांनी केली आहे.गौरव राजेश अग्रवाल म्हणाले की, बुलढाणा येथील कायमचा रहिवाशी असून माझी दुकान ही अनेक वर्षापासून कारंजा चौक येथे आहे. तसेच कारंजा चौकाला
लागून भव्य अग्रेसन महाराजाचा पुतळा बसविण्यात आलेला आहे व त्या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हा पुतळ्याच्या आजूबाजूला नगर परिषद मार्फत अवैधरित्या टपरी टाकून केलेले अतिक्रमण काढण्यात आले होते. परंतू पुतळ्याचे अनावरण झाल्याच्या 2 ते 3 महिन्यानंतर अनेक लोकांनी उर्दू शाळा व अग्रेसन महाराज यांचे पुतळयाच्या अवतीभवती व न.प.च्या बांधकाम विभागाच्या समोर व आरोग्य विभागाच्या लगत अनाधिकृतरित्या अतिक्रमण तयार केले आहे. तसेच अग्रेसन महाराज यांचे पुतळ्याच्या बाजूलाच धुम्रपान करतात व पान खावून त्या पुतळ्याच्या बाजूलाच थुंकतात, त्यामुळे पुतळ्याची एक प्रकारे विटबंना होण्याची शक्यता आहे. तसेच बाजूला सोडा सेंटरचे दुकान असून त्या दुकानात असंख्य ग्राहक येतात. त्यामुळे या रस्त्यावर खूप गर्दी असते. दूषीत पाणी सुध्दा रोडवर सोडण्यात येते. यामुळे तेथे घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. तसेच रविवारच्या वेळेस पार्किंगच्या जागेवर लोक मोठ-मोठी दुकाने टाकून अतिक्रमण करुन वाहतूकीस कोंडी करतात. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होवून जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे गौरव अग्रवाल यांनी निवेदनात म्हटले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!