spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – चिखलीत मोठा घोटाळा! बनावट आदेशावर मिळवले जमिनीचे हक्क? नागवाणी बंधूंना जेलची हवा?

चिखली (हॅलो बुलडाणा) चिखलीतील नथ्थुमल सेजुमल नागवाणी व भगवानदास गोपालदास नागवाणी या दोघांनी बनावट शासकीय आदेश तयार करून शासनाची व भूमिअभिलेख विभागाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी देखील तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.राजस्व प्रकरण क्रमांक एम.आर.सी/81/चिखली/37/2010-11 अंतर्गत 30 जुलै 2011 रोजी पारित झालेला आदेश बनावट असून, त्याची कुठलीही नोंद उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बनावट आदेश सादर करून नागवाणी बंधूंनी जमिनीच्या फेरफारासह पी.आर कार्ड मिळवले होते.

या प्रकरणी चौकशीत समोर आले आहे की, आदेश हा उपविभागीय अधिकारी यांनी दिला नसून, मूळ अभिलेख देखील उपलब्ध नाही. त्यामुळे बनावट दस्तऐवजाद्वारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई होणार आहे. चिखली उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाने पोलिस निरीक्षकांना गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र पाठवले असून, पुढील तपास सुरु आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!