देऊळघाट (हॅलो बुलडाणा/ इमरान खान) जिल्ह्यात चंदन झाडांची तस्करी तर झालीच आता देऊळघाट वनपरी क्षेत्रात अवैधपणे खैर या वृक्षाची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्याचे आरोप होत आहे.याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरफान सय्यद अख्तर यांनी माहिती मागितली असता त्यांना टोलवा टोलवी करण्यात आली.
बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाअंतर्गत असलेल्या देऊळघाट येथील वनपरिक्षेत्रातील खैर या वृक्षांच्या झाडाची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली आहे. याबाबत माहिती या भागातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरफान सय्यद अख्तर यांनी बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकार अंतर्गत मागितलेली असता त्यांनी माहिती देता येत नसल्याचे पत्र संबंधित कार्यकर्त्यांना दिले आहे.त्यामुळे संशय बळावला आहे.हा प्रकार वनविभागाच्या तोंडाला काळे फासण्याचा असल्याचे आरोप R.T.I कार्यकर्ते सय्यद इरफान यांनी केला आहे.
त्यांनी दिलेल्या माहिती अधिकार अंतर्गतच्या अर्जात नमूद केले आहे की, मौजे देऊळघाट शिवारातील “खैर” जातीच्या वनवृक्षांना तोडण्याच्या पासेस ज्या लोकांना दिला त्यांची नावे द्या तसेच त्यांना किती झाडे तोडण्याची परवाना पास दिली? या माहितीसह “खैर” या वन वृक्षांची किती झाडे उभी आहेत? व झाडे तोडण्या वेळी किती झाडे होती? याबाबत माहिती मागितली मात्र त्यांना यापूर्वी त्रयस्थ व्यक्तीकांनी सदर माहिती मागितली असल्याने सदर माहिती देता येत नाही असे पत्र देऊन दिशाभूल करण्याच्या प्रयत्न केला आहे. तरी या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याबाबतच्या सूचना कराव्यात त्याचप्रमाणे माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेवर बेजबाबदारपणे वागल्या प्रकरणी त्यांचेवर शासन नियमाप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.










