spot_img
spot_img

💥खबरदार ! ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापराल तर..! – जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचा मनाई हुकूम!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्रे (UAV) यंत्र चालविण्यास, उडविण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.

जिल्ह्यात ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्रे (UAV) याचा वापर काही असामाजिक तत्वांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्रे (UAV) अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी त्वरित त्यास प्रतिबंध करणे गरजेचे असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये दिनांक 14 मे 2025 पासून दि. 3 जून 2025 पर्यत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे हद्दीत कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्रे (UAV) यंत्र चालविण्यास, उडविण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
कोणतीही व्यक्ती आदेशाचे उल्लंघन करील तो भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असे ही प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!