बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुलीचे प्रेम संबंध आहेत अशी समाजात खोटी बदनामी करून तिला जीवाने मारण्याची धमकी दिली. तिचा छळ सुद्धा केल्याने पिडीतेने या जाचा ला कंटाळून विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघां विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ही घटना मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिस ठाणे अर्तंगत उघडकीस आली.
पोलीस पोलिसांच्या माहितीनुसार, बेबीबाई राजू सोळंके रा.दाताडा ता.मलकापूर जि. बुलढाणा ह.मु. तालखेड ता. मोताळा यांनी आरोपी नातेवाईक विजू अशोक सोळंके, हिरामण सदाशिव पवार, प्रमीला हिरामण पवार सर्व रा. परडा फाटा ता. मोताळा यांच्या विरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी त्यांचा मुलगा विश्वजित याचे सोबत पिडीत मुलगी लता राजू सोळंके (वय 21) हीचे प्रेमसंबध असल्याची समाजात खोटी बदनामी केली. व तिला जिवाने मारण्याची धमकी दिली.त्यामुळे तिने आरोपींच्या जाचाला कंटाळून विषारी द्रव्य राशन करून आत्महत्या केली. या आरोपींनी पिडीतेस आत्महत्येस प्रवृत्त केले आहे, असे पोलिसांच्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विजू अशोक सोळंके, हिरामण सदाशिव पवार, प्रमीला हिरामण पवार सर्व रा. परडा फाटा ता. मोताळा यांच्या विरुद्ध कलम 108,351 (2) बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.