spot_img
spot_img

मुख्यमंत्र्यांना वाळू तस्कर पुष्पांचे चॅलेंज? – तब्बल 14 बॅरीयर तोडल्याने ‘समृद्धी’ धोक्यात!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अवैध वाळू पुष्पा तस्कर यांनी समृद्धी महामार्गावरचे 14 ठिकाणी क्रश बॅरियर तोडून झुकत नसल्याचे चित्र आहे.येथून सुसाट रेती टिप्परांची वाहतूक सुरू असते.विशेष म्हणजे या वाहनांची कुठेही एन्ट्री होत नाही क्रश बॅरियर तोडून खाली उतरतात त्यामुळे कुठलेही टोल नाही एंट्री नाही असा प्रकार काही महिन्यापासून सुरू आहे.त्यामुळे समृद्धी महामार्ग पूरता धोक्यात आला आहे.

राज्यातील सुरक्षित समजल्या जाणारा समृद्धी महामार्ग असुरक्षित झाला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर 14 ठिकाणी वाळू माफियांचा अनधिकृत प्रवेश होतोय. त्यांनी समृद्धी महामार्गावरील 14 ठिकाणी क्रश बॅरियर तोडले मात्र याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. येथे असंख्य वाळू चे टिप्पर सुसाट समृद्धीवरून धावतायेत.त्यांना
कुठेही टोल नाही व एंट्री सुद्धा नाही.एम एस आर डी सी व जिल्हा प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने नवल व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महत्वकांक्षी महामार्ग म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग होय. सुसाट महामार्ग नागपूर ते मुंबई 701 किमी चा असून बुलढाणा जिल्ह्यातून हा महामार्ग 87 किमी जातोय.मध्ये या माहामार्गावर मोठमोठे भीषण असे अपघात झाले अनेकांचे जीव या मार्गांवर गेलेत. शापीत समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला आता वेगळेच ग्रहण लागले असल्याचे दिसून आले आहे.
समृद्धी महामार्गांवरील वाहतूक कमी वेळात पोहोचण्याचा मार्ग असे वैशिष्ट्य आहे.या महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी राज्य सरकारने विविध उपाय योजना राबविल्या होत्या. त्या बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरल्या आहेत.
आता या मार्गांवर अपघाताचे प्रमाण कमी झाले असले तरी व सरकारच्या वतीने सांगण्यात आले की आता अपघात होणारच नाही व सुरक्षित असा हा मार्ग असे दावे करण्यात आले असले तरी ते दावे फोल ठरत चालले आहेत कारणही तसंच आहे.
जिल्ह्यातील 87 किमी समृद्धी महामार्गांवर 14 ठिकाणी रस्त्याचे क्रश बॅरियर तोडून अनधिकृत प्रवेश तयार करण्यात आले असून या अनधिकृत खुष्कीच्या मार्गावरून समृद्धीवर प्रवेश करीत सुसाट वाहने धावताना दिसत आहेत. त्यामुळे आता हा समृद्धी महामार्ग सुरुक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

▪️ ये क्या हो रहा है?

जिल्ह्यातील सर्वात मोठी खडकपूर्णा नदी ही देऊळगावराजा, सिंदखेडराजा या भागातून वाहतेय याच नदीतून रेती माफीया सर्रास अवैध वाळू उपसा करीत आहे. ती वाळू ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी या समृद्धी महामार्गाचा उपयोग केला जात आहे.तब्ब्ल 14 ठिकाणी क्रश बॅरियर तोडून रेतीचे टिप्पर समृद्धी महामार्गांवर प्रवेश करतात व सुसाट वेगाने धावतात व वेळेच्या आत ठिकाणावर रेती पोहोचवतात.वास्तविक पाहता समृद्धी महामार्गांवर चढण्यासाठी इंटरचेंजचाच वापर करावा लागतो जिथे टोल नाका असतो तिथे वाहनांची एंट्री केल्या जाते व नंतर हा मार्ग सोडताना सुद्धा पुढील टोल नाक्यावरूनच खाली उतरता येते व तिथे टोल कर भरल्या जातो.मात्र आता अवैध रेती माफीयांनी धुमाकूळ घातला असून ते सरळ क्रश बॅरियर तोडून समृद्धी मार्गावर् प्रवेश करतात त्या वाहनांची कुठेही एंट्री होत नाही व जिथे उतरतात तिथेही असेच क्रश बॅरियर तोडलेल्या ठिकाणावरून खाली उतरतात. त्यामुळे कुठेही टोल नाही ,एंट्री नाही असा प्रकार तिथे महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यात सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज?

अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच चॅलेंज केले असून आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही, अशीच धमकी दिली असावी? म्हणजे आता हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग सुरक्षित राहिला नसल्याचे स्पष्ट झाले असून संबधित विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. आर टी ओ, पोलीस, महसूल जिल्हा प्रशासन हे फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसतायेत. वाळू माफीयांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून त्यांच्यावर कुठलीही कारवाई केल्या जात नाही.
आता वाहन धारकांनो समृद्धी महामार्गावर कुठलाही टोल भरायचे काम नाही. खुष्कीच्या मार्गाने सुसाट प्रवास करा व खुश्कीच्या मार्गाने खाली उतरा…असा संदेश वाळू माफियांनी देण्याचा प्रयत्न केलाय.या सर्व प्रकाराकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष देतील का व खुष्कीचे मार्ग बंद करतील का तसेच समृद्धी महामार्ग सुरक्षित पुन्हा होईल का.. असे अनेक प्रश्न जिल्हावासी करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!