माळवीहीर (हॅलो बुलडाणा) ग्रामपंचायतीने कठोर पाऊल उचलत गावातील सार्वजनिक ठिकाणचा घाण कचरा उचलून परिसर स्वच्छ केला आहे. मात्र यापुढे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा सडलेली जनावरे टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे की, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, कोणतीही चुकीची कृती करणाऱ्यांची ओळख पटवून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
माळवीहीर ग्रामपंचायतीचे हे धडक पाऊल गावाच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत, या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.