बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘कानून के हाथ लंबे होते है..’हा डायलॉग स्थानिक गुन्हे शाखा प्रत्यक्षात नेहमीच खरे ठरवते. कालही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
सराईत चोरी करणारे 9 गुन्हेगार जेरबंद केले. यामध्ये जबरी चोरी करणारे 4 व चोरीच्या 10 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून 9 आरोपी ताब्यात घेण्यात आले. जप्त मुद्देमालाची कारवाई सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृध्दी महामार्ग तसेच इतर ठिकाणी घडलेल्या जबरी चोरी तसेच
घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन ,पोलीस अधीक्षक श्री. सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, श्री.
बी. बी. महामुनी यांनी गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यान श्री. अशोक लांडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांनी या अनुशंगाने अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र समांतर तपास
पथके तयार करुन गुन्ह्याची यशस्वी उकल, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना
केल्या. दरम्यान
फिर्यादी श्री. रुषीकेश शिवाजी जगदाळे वय 28 वर्षे रा. तेरखेडा ता. वाशि जि. धाराशिव यांनी पो.स्टे. डोणगांव येथे
रिपोर्ट दिला की, दि. 10/05/2024 रोजी फिर्यादी त्याचे वाहनासह समृध्दी महामार्गावरील रोडवर आराम करण्यासाठी उभे असतांना, तीन अनोळखी इसमांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून, फिर्यादी व साक्षीदार यांचे जवळील नगदी रोख व ईतर सोने चांदी व लॅपटॉप साहित्य असा एकूण 1,65,000/- रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. तपास चक्रे फिरवली असता गोपनीय माहिती नुसार, सदर गुन्ह्यात जालना जिल्हा व मध्यप्रदेश राज्यातून आरोपी अटक करण्यात आलेले आहेत.समीर नुर मोहम्मद मेव वय 25 वर्षे रा. दुपाडा ता. जि. शहाजापूर, मध्य प्रदेश राज्य,राकेश गुजल चंदेल वय 21 वर्षे रा. रा. दुपाडा ता. जि. शहाजापूर, मध्य प्रदेश राज्य, धरमराज विक्रम हरीजन वय 19 वर्षे रा. रा. दुपाडा ता.
जि. शहाजापूर, मध्य प्रदेश राज्य, रावण ऊर्फ अभिषेक प्रताप गवारे वय 21 वर्षे रा. साडे सावंगी, ता. अंबड जि. जालना, रंगनाथ बाजीराव डनडे वय 25 वर्षे रा. जालना, विक्रम गोपाल राजपूत वय 31 वर्षे रा. जालना, संतोष अंबादास वाघमारे वय 24 वर्षे रा. गारखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना,राहूल राधाकिसन कोकाटे वय 21 वर्षे, रा. गारखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना, जावेद हबीब मुल्लानी वय 29 वर्षे रा. गारखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना यांना अटक करण्यात आली आहे.तपासा दरम्यान आरोपीतांनी जबरी चोरीचे 4 व चोरी – 10 एकूण 14 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.