बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे मा.आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या कन्येचा विवाह सोहळा भव्य थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्यात जेवण व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी ‘कायस्थ कॅटर्स’ कडे देण्यात आली होती. जवळपास 14 ते 15 हजार पाहुण्यांसाठी व्हीआयपी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली. पाहुण्यांनी शेवटपर्यंत भोजनाचा आस्वाद घेतला आणि ‘कायस्थ कॅटर्स’ ची प्रशंसा केली.
विवाहसोहळ्यानंतर विजयराज शिंदे यांनी ‘कायस्थ कॅटर्स’ च्या संपूर्ण टीमचा सत्कार केला आणि व्यवस्थेचे मनापासून कौतुक केले. संचालक राजेंद्र कायस्थ, यश कायस्थ, शुभम कायस्थ, ओम कायस्थ, हर्ष कायस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 300 जणांच्या टीमने उत्कृष्ट सेवा दिली.’हॅलो बुलढाणा’ च्या माध्यमातून पत्रकार व पाहुण्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, पत्रकार वसीम शेख यांनी “जेवणाचा स्वाद अप्रतिम होता, पोट भरलं पण मन भरलं नाही,” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या एका पाहुणीने सांगितले की, “जेवणाची व्यवस्था इतकी सुंदर होती की आम्ही त्याचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड केले आहेत.”
हिंगोलीचे संदीप बनसोडे काय म्हणाले?
त्यांनी सांगितले की, “विजयराज शिंदे आमचे पाहुणे आहेत. त्यांनी पाहुण्यांसाठी केलेली व्यवस्था आणि जेवणाची सुविधा एकदम उत्तम दर्जेची आणि अतिशय सुंदर आहे.”संदीप बनसोडे यांच्या मते, पाहुणचार हा अतिथी-सत्काराचा एक विशेष भाग असून, त्यामध्ये प्रेम, आदर आणि सेवा यांचे दर्शन घडते. विजयराज शिंदे यांनी केलेली व्यवस्था पाहून ते भारावून गेले असल्याचे त्यांनी सांगितले.