spot_img
spot_img

💥अन् पालकांचे चेहऱ्यावर हास्याची लकेर! ‘स्टडी टेबल व स्कुलबॅग उपयुक्त ठरतील-ना. जाधव’ – तब्बल १६ हजार विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व स्टडी टेबल वाटपास शुभारंभ! – केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचा विशेष प्रयत्न!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करतांना भौतिक सुविधा आणि गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेणे तितकेच आवश्यक असून त्यादृष्टीने हिंदुस्थान पेट्रोलियम व अवंत फाऊंडेशनने दिलेले स्टडी टेबल व स्कुलबॅग उपयुक्त ठरतील असा विश्वास केंद्रीय आयुष राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला.ना. जाधव यांच्या विशेष प्रयत्नांतून एचपीसीएल च्या सीएस-आर. निधीतून अवंत फाऊंडेशनच्या समन्वयाने बुलढाणा जिल्हयातील १६६६७ विद्याथ्यांना मोफत स्कुल बॅग व स्टडी टेबल वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ १६ मे रोजी येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, शिक्षणाधिकारी (प्राथ) बी-आर. खरात, शिक्षणाधिकारी योजना वैशाली ठग प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच एचपीसीएलचे उपमहाप्रबंधक विशाल शर्मा आणि भारत सरकारच्या कोळसा व खाण मंत्रालयाचे प्रमुख तांत्रिक सल्लागार अवनीश त्रिपाठी यांची विशेष उपस्थिती लाभली. प्रातिनिधीक स्वरुपात पन्नास विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्कुल बॅग वाटप करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरविंद शिंगाडे यांनी तर आभारप्रदर्शन उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अवंत फाऊंडेशनचे आकाश विश्वकर्मा, उपशिक्ष‌णाधिकारी उमेश जैन, इश्वर वाघ आदींनी परिश्रम घेतले.

▪️ काय केले?

* आय आय टी कानपुर यांनी या स्कुल बॅग व स्टडी टेबलचे डिझाईन केले आहे.

* यामुळे विद्यार्थ्याच्या पाठीच्या कण्याचा त्रास कमी होईल.

* विद्यार्थ्यांचे डोळे व रक्ताभिसरण यांचे आरोग्य चांगले राहील.

* विद्यार्थ्यांना जास्त वेळ वाचन आणि लेखनकाम करता येईल.

* डोक्यावरील ताण, मानदुखी, पाठदुखी इ. त्रास कमी होईल.

▪️मिशन” झेड’ चे कौतुक!

जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या संकल्पनेतून मिशन झेड उपक्रम सुरु करण्यात आला असून, त्याद्वारे गुणवंत विद्याथ्यांना नीट व जेईई परीक्षांच्या नामवंत क्लासमध्ये मोफत मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. या उपक्रमात विशेष योगदानासाठी शिक्षणाधिकारी (प्राथ) बी. आर. खरात व शिक्षणाधिकारी (योजना) वैशाली ठग यांना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.

▪️UPSC तील यशाबद्दल मोहिनी खंदारे यांचा सत्कार..

बुलढाणा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कु.मोहिनी खंदारे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा मंत्रीमहोद‌यांच्या हस्ते शाल-पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!