बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘सत्याचा साथीदार’ म्हणून ओळख असलेल्या ‘हॅलो बुलढाणा’न्यूजने नुकतीच डेंग्यू व चिकनगुनिया बाधितांची बातमी अधोरेखित केली होती. इस डेंग्यूचे रुग्ण आणि बारा चिकन गुन्ह्याचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे आणखी एक पंधरा महिन्यांचा डेंग्यूचा रुग्ण आढळून आला. हा लहान मुलगा सिटी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे. परिणामी आरोग्य विभागाला अलर्ट मोडवर येण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत नेहमीच वाढ होत असली, तरी वर्षभर या आजारांचे रुग्ण सापडत असतात. जानेवारी ते मे 2024 पर्यंत डेंग्यूचे 30 व चिकनगुनिया चे 12 रुग्ण सापडल्याने बुलढानेकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
हिवताप,चिकनगुनिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी विविध उपाययोजना राबविल्या जातात. असे असताना हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. हिवताप अधिकारी कार्यालयाकडून माहिती जाणून घेतली असता, तब्बल 44493 घरात सर्वेक्षण दरम्यान डासअळ्या आढळून आल्या आहेत. दरम्यान डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यात धडक विशेष मोहीम राबविल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
▪️ कोलवड येथे घाणीचे साम्राज्य
बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे पावसाचे दिवस असल्यामुळे घाणिचे साम्राज्य नांदत आहे. सरपंचासह ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष होत असून गावात जागोजागी गटार तुंबली आहेत. परिणामी लहान बालक व ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.