बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भारत- पाकिस्तान युद्धाला विराम मिळाला असला तरी,खामगाव तालुक्यातील काही गावांवर हेलिकॉप्टर का घिरट्या घालत आहे?असा सवाल ग्रामस्थांच्या मनात उपस्थित झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाल्याचे चित्र आहे.परंतु सदर हेलिकॉप्टर हे नळगंगा व पैनगंगा नदीचा सर्वे करीत असल्याचे सांगण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले होते.या हल्ल्याला भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यामुळे पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकले असून, आता युद्धबंदीचा करार झाला आहे. युद्ध बंद झाले असले तरी, काल-परवा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील काही गावांवर हेलिकॉप्टरने घिरट्या घालल्या आहे.खामगाव तालुक्यातील गवंडाळा व हिवरखेड या गावावर सात ते आठ वेळा हेलिकॉप्टरने घिरट्या घातल्याने ग्रामस्थ भयभीत झाले.ग्रामस्थांच्या मनात शंका- कुशंका निर्माण झाल्या.दरम्यान सदर हेलिकॉप्टर नळगंगा व पैनगंगा नदीचा सर्वे करीत असल्याची माहिती सिंचन अधिकारी यांनी दिली असून नागरिकांनी घाबरू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.