मेहकर (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील एका गावातील प्रियकराने प्रेमप्रकरणातून इंस्टाग्राम वर काही पोस्ट व कॉल रेकॉर्डिंग करून आत्महत्या केल्याने प्रेयसी च्या 9 नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रियकराच्या काकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
सदर प्रियकर व एका प्रेयसीचे ३ वर्षापासून सुत जुळले होते. प्रियकर मेहकर तालुक्यातील एका गावचा असून प्रेयसी सिंदखेडराजा तालुक्यातील एका गावची आहे.दोघांच्या लग्नांना मुलीच्या गावाकडील मंडळीचा विरोध होता.कारण युवतीचे लग्न नात्यातील एका मुलाशी ठरले होते.दरम्यान दोघां प्रियकर व प्रेयसीचे प्रेम प्रकरण रंगलेले असतांना घरच्यांना माहित झाल्यावर युवतीच्या घरातून प्रखर विरोध सुरू झाला होता. दरम्यान प्रियकराने 13 मे रोजी सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आधी इंस्टाग्राम वर पोस्ट करून कोणाच्या दबावात आत्महत्या करीत आहे ते स्पष्ट लिहिले.गावातील काही लोकांच्या व्हाट्सअप वर मेसेज सुद्धा करण्यात आले आहे.या मेसेज नुसार प्रेयसीच्या आत्याच्या पुतण्याने त्याला आणि त्याच्या आईला नीट राहण्याची धमकी दिली. एकुण 9 जणांनी त्रास दिल्या मुळे प्रियकराला वेळोवेळी मरण्याची धमकी दिल्याने त्याला आत्महत्यास प्रवृत्त झाल्याचे तक्रारी म्हटले आहे.या तक्रारीवरून अर्चना हरकळ, अविनाश हरकळ दोन्ही रा. बाळसमुद्र ता. सिंदखेड राजा, पंढरी तांगडे, धनंजय तांगडे, छाया दिलीप तांगडे ,दिलीप तांगडे सर्व रा. कळपविहीर ता. मेहकर, समाधान जाधव, चांगुणा जाधव दोन्ही रा. सायाळा ता. सिंदखेड राजा, यज्ञेश्वर भागवत आव्हाळे, रा. सायाळा ता. सिंदखेड राजा या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.