बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सिआरपीएफ च्या डेल्टा कंपनी 238 बटालियन मध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेले स्थानिक निवासी गजानन वामनराव डाखोडे हे त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी गावी आले होते.मात्र लग्न आटोपून ते अधिकाऱ्याच्या आदेशानुसार लगेच सीमारेषेवर कर्तव्यासाठी परतले आहे. या कृतीने त्यांनी आपली देशसेवा सिद्ध केली आहे.
ऐन लग्नाच्या दिवशी कंपनी कमांडर चा त्यांना कॉल आला. भारत-पाकिस्तान तणावाचे पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर करीता निर्धारित सुट्टीचा कालावधी रद्दबातल करुन देशसेवेसाठी परत येण्याचा आदेश देण्यात आला. दोन दिवस अधिकचा अवकाश मागून गजानन डाखोडे यांनी काल सिमेकडे प्रस्थान केले. उर्वरित लग्नकार्य व इतर समारंभ सोडून लग्नाचे पाहुणे, आप्तस्वकीय व गावकऱ्यांचा त्यांनी निरोप घेतला.दरम्यान “पाकड्यांना धडा शिकवून यशस्वी परत या ” अशा शुभेच्छा या सर्वांनी दिल्या. निरोपाचा हा प्रसंग भावूक होता. यावेळी स्थानिक पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक बोपटे हे गजानन डाखोडे यांना मार्गस्थ करण्यासाठी आले होते. ‘भारत माता की जय, जय जवान जय किसान’ च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता.