बुलढाणा (हॅलो बुलडाणा) प्रसिद्धीच्या मागे न लागता जो सिद्धीच्या मागे लागतो त्याची काळ एक दिवस निश्चितच दखल घेतो.अशाच जिद्दीने पेटलेल्या अवघ्या तिसरीत शिकणाऱ्या सिद्धी विठ्ठल सोनुने हीने इंडिया रेकॉर्ड बुक मध्ये विक्रमाची नोंद केली आहे.सर्वात कमी वयात कोकणकडा रॅपलिंग म्हणजे दोरीने खाली उतरण्याचा विक्रम तिने केला आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिराचा मळा साखळी बुद्रुक येथील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी सिद्धी विठ्ठल सोनुने हिने वयाच्या अवघ्या नव्या वर्षी कोकणकडा दरी रॅपलिंग
म्हणजे दोरीने खाली उतरण्याचा विक्रम केला आहे. याची उंची सुमारे 1800 फूट आहे 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी सिद्धीने हरिश्चंद्रगड व तारामती शिखर चढण्यास पाचनाई गावातून सकाळी ०४ वाजून ३० मिनिटाला सुरुवात केली व सकाळी ०८ वाजता कोकणकड्यावर पोहोचली व तेथे भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून १० वाजून १० मिनिटांनी कोकणकडा उतरण्यास सुरुवात केली. अतिशय कठीण चढाई व रॅपलिंग म्हणजेच दोरीच्या सहाय्याने १२ वाजून ३० मिनिटांनी कोकण कड्यावरून सिध्दी खाली उतरली. तिला हिमॉर्डील ट्रेक ॲडव्हेंचर कंपनीने “सह्याद्रीची हिरकणी” म्हणून असे नाव दिले. वयाच्या अवघ्या नव्या वर्षी कोकणकडा दरी उतरणारी सिद्धी ही भारतातील गिर्यारोहक ठरली आहे.
तिच्या या विक्रमाची नोंद इंडिया रेकॉर्ड बुक मध्ये घेण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा सिद्धी इयत्ता पहिलीत असताना कळसुबाईची शिखर सर केले तर इयत्ता तिसरी मध्ये असताना २६
जानेवारी २०२५ रोजी हिमालयातील केदारकंठा सुमारे 12 हजार पाचशे फूट सर केले व तिरंगा फडकविला.आता इयत्ता तिसरी मध्ये कोकणकडा दरी उतरुण एक यशस्वी गिर्यारोहक होण्याकडे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. भविष्यामध्ये सर्वात कमी वयात माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे सिद्धीचे स्वप्न असून तिच्या या यशामध्ये तिचे आई वडील यांचा सिंहाचा वाटा आहे. आमदार संजूभाऊ गायकवाड, मुख्याध्यापक पांडव मॅडम, फुल ब्राईट स्कॉलर टीचर्स शिवाजी देशमुख सर डॉ. शिवशंकर गोरे, जैन यांचे तिला
मार्गदर्शन मिळत असते.