spot_img
spot_img

💥EXCLUSIVE वाढदिवस स्पेशल! रविकांत तुपकर होणं सोपं नाही! – जनतेच्या कसोटीवर यशस्वी ठरो..राज्याचे नेतृत्व करो!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘संघर्षाच्या रणरणत्या उन्हात जळून न जाता.. दगडावर उगवून येणं सोपं नाही..खरं सांगते..रविकांत तुपकर होणं सोपं नाही!’ अशा फेसबुक पोस्टवरील ओळी स्वाभिमानी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तूपकर यांच्या बद्दल बरंच काही सांगून जातात!

रविकांत तुपकर ‘मुलुख मैदानी तोफ’ म्हणून आजवर अनेक मैदानावर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी धडाडले आहे. त्यांची आंदोलने म्हटली की, प्रशासकीय यंत्रणेलाच काय राज्यकर्त्यांना सुद्धा घाम फुटतो आणि हे त्यांनी आपल्या कर्तुत्वातून जगाला दाखवून दिले आहे.खरे म्हणजे क्षेत्र कोणतेही असो राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करतांना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्याची गरज असते. कणखर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लहान पासून सुरू केलेल्या शेतकरी चळवळीत अनेक कार्यकर्त्यांना घडविले आहे. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत रविकांत तुपकर यांनी जनमाणसात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सत्ताधारी मुजोर झाले म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सक्षम राजकीय नेतृत्वाची गरज आहे.यासाठी रविकांत तुपकर योद्धा म्हणून निवडणुकीतील जय-पराजयाच्या छाताडावर पाय रोवून उभे असून दुर्दम्य इच्छाशक्तीने त्यांनी आपली घोडदौड सुरू ठेवली आहे.त्यांनी काही विरोधकांच्या काळजाला भागदाड पाडून असंख्यांच्या काळजाला हात घातला आहे.
आज 13 मे रोजी रविकांत तुपकर यांचा वाढदिवस आहे.या वाढदिवशी देखील त्यांनी सेलिब्रेशन टाळून शेतकरी व भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या निवासस्थानी अंगणातच उपोषण सुरू केले.पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.दरम्यान शेतकरी समस्या सोडवण्याकरिता चर्चेतून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.रविकांत तूपकर यांच्या कडून जनतेला फार मोठ्या अपेक्षा आहेत. जनतेच्या कसोटीवर ते यशस्वी ठरो आणि राज्याचे नेतृत्व करो, हीच वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा…

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!