बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भगवान बुद्धांच्या जन्मदिनी, म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रम घेण्यात आले असून, बुलढाणा अर्बन परिवाराने सुद्धा घेतलेल्या बुद्ध जन्मोत्सव सोहळ्यात धार्मिक व सामाजिक विचारांचा संगम दिसून आला.
पुज्यनिय महाथेरो धम्मज्योतीजी भंतेजी, पुज्यनिय स्वरानंद भंतेजी आणि आमनेर संघाचे पुज्यनिय भंतेजी संतचित्ता थेरो (श्रीलंका) यांच्या हस्ते बुध्द वंदना व धम्म देशना आयोजित करण्यात आली. या पवित्र सोहळ्यात उपस्थितांनी उत्साहाने सहभाग घेतला.यशसिध्दी सैनिक सेवा संघाच्या वतीने महार रेजिमेंटच्या सैनिकांना आणि रमाईच्या लेकी ग्रुपकडून पंचशील धम्म ध्वजाला मान वंदना देण्यात आली. वंदनीय भिख्खु संघालाही सन्मानित करण्यात आले. या विशेष कार्यक्रमास सीआरपीएफच्या असिस्टंट कमांडंट मोनिका साळवे, अण्णाभाऊ साठे प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके, बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, अध्यक्ष डॉ. सुखेशवर, कोमल झवर यासह शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान प्रमुख वक्त्यांनी बुद्ध धम्माचे समाजातील योगदान, समता, प्रेम, करुणा आणि अहिंसा या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, बुद्ध धम्माच्या विचारांमुळे समाजात शांतता आणि सुसंवाद निर्माण होऊ शकतो. विविध धार्मिक व सामाजिक विचारांचे संगम असलेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.