spot_img
spot_img

अवैध रेती तस्करांचा हैदोस — प्रशासनाच्या गाडीवर दगडफेक; अदखलपात्र गुन्हा दाखल!

सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा) तालुक्यात अवैध रेती तस्करीने थैमान घातले असून, प्रशासनावरच सर्रास हल्ले होत आहेत. निमगाव वायाळ येथे रेती वाहतूक रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनावर अज्ञात तस्करांनी दगडफेक केली. या हल्ल्यात वाहनाची समोरील काच फोडली गेली असून, प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.ही घटना १० मे रोजी सकाळी घडली. तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाहन तस्करी रोखण्यासाठी तैनात होते. मात्र, तस्करांच्या या धाडसाने कायदा-सुव्यवस्थेचा फज्जा उडाला आहे.

तलाठी पवार यांची तक्रार; अदखलपात्र गुन्हा नोंद
तलाठी पवार यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला. मात्र, एवढ्या गंभीर प्रकारानंतरही फक्त अदखलपात्र गुन्ह्यावर प्रकरण थांबवणे म्हणजे तस्करांना मोकळीक देण्यासारखे असल्याची टीका होत आहे.

‘बैठं पथक’ हटवले — तस्कर मोकळे!
पूर्वी रेती तस्करी रोखण्यासाठी नेमलेले ‘बैठं पथक’ माध्यमांच्या बातम्यांनंतर हटवण्यात आले. त्यामुळे तस्करांना मोकळे रान मिळाले आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!