spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – ‘सातवा बेडा असो की सत्तरवा, हिंदुस्थान कधीच झुकणार नाही!’ अमेरिकेचा दबाव फोल ठरवणारी इंदिरा गांधींची ठाम भूमिका – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पोस्ट चर्चेत!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या सामाजिक माध्यमावर केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. सपकाळ यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ठाम नेतृत्वाचा उल्लेख करत, त्यांच्या ऐतिहासिक निर्णयांची आठवण करून दिली आहे.सपकाळ यांनी पोस्टमध्ये नमूद केले की, “हिंदुस्थान कोणाच्याही भीतीने झुकत नाही, मग तो सातवा बेडा असो किंवा सत्तरवा!” अमेरिकेच्या सातव्या बेड्याने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा इंदिरा गांधींनी निर्धाराने अमेरिकेला प्रत्युत्तर दिले होते. “कोणत्याही देशाने भारताला आदेश देण्याचा धाडस करू नये,” असे ठणकावून सांगणाऱ्या इंदिरा गांधींच्या या ऐतिहासिक भूमिकेचे सपकाळ यांनी कौतुक केले.

सपकाळ यांची ही पोस्ट काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करत असताना, विरोधकांमध्ये मात्र चर्चेचा विषय बनली आहे. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाची तुलना सध्याच्या परिस्थितीशी जोडत सपकाळ यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!