बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा परिषद अंतर्गत शाळेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा प्रक्रियेत गोंधळ झाल्याच्या बातम्या ‘हॅलो बुलढाणा’ ने आधीच प्रसारित केल्या होत्या.या बातम्यातील सत्य शासन दरबारी पोहोचले असून, आता बोगस लाभ घेणाऱ्या शिक्षकांना नोकरी गमावी लागण्याचे संकेत आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात आंतर बदली करून घेण्यासाठी व विविध लाभ लाटून घेण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान ‘हॅलो बुलढाणा’ने या संदर्भात रोखठोक भूमिका मांडली होती.आता या प्रकरणी पूर्नतपासणी व्हावी असा आदेश शिक्षण विभागाने घेतला.राज्य शिक्षण विभागाने देखील याप्रकरणाची गंभीर दखल घेत, दिव्यांग शिक्षकांच्या पूर्नतपासणीचे आदेश पारित केले आहे.त्यामुळे दिव्यांग शिक्षकांचे प्रमाणपत्र चेक केले जाणार आहेत. संबंधित गटशिक्षणाधिकारी हे प्रमाणपत्र चेक करणार आहे. प्रमाणपत्राची वैधता तपासून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. ज्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन बदली मिळविली त्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्य शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, जिल्हा परिषद शाळेतील संवर्ग १ चा लाभ घेणाऱ्या शिक्षकांनी मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटल मधून पुर्नतपासणी करून प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असून दुसरीकडे शासनाच्या या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे.