चिखली (हॅलो बुलडाणा) दुपारच्या झंजावती वाऱ्यामुळे भले मोठे बाभळीचे झाड चिखली-बुलढाणा रोडवरील मालगणी फाटा नजीक रस्त्यावर कोसळल्याने आज काही काळ रहदारी ठप्प झाली होती.या घटनेमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या सुसाट वाऱ्याने आणि जोरदार पावसामुळे बाभळीचे झाड रस्त्यावर कोसळले. झाड कोसळल्याने चिखली-बुलढाणा रस्त्यावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. हा रस्ता आधीच अरुंद असून, या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे या घटनेने परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान असून, झाड हटवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.तोपर्यंत वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला होता. या घटनेमुळे काही काळ वाहनधारकांना रस्त्यातच अडकून पडावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला.