spot_img
spot_img

💥विघातक कृत्याला आळा! एमपीडीए कायद्यांतर्गत 2 ‘दादा’ स्थानबद्ध!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विघातक प्रवृत्ती वाढत असल्याने समाजाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हा पोलीस दल प्रयत्नशील असून, बुलढाणा शहर व जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील 2 जणांना एमपीडीए कायद्यांतर्गत जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशावरून एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याची कारवाई करण्यात आली.

जिल्ह्याच्या अभिलेखावर मालमत्ता, शरीरा विरुद्ध, अवैध दारू व इतर तत्सम गुन्हे दाखल असलेल्या इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, द्रव्य विषयक गुन्हेगार,हातभट्टी दादा तसेच धोकादायक इसमाच्या विघातक कृत्याला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते.दरम्यान दोन गुन्हेगारा बाबत एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आल्याने बुलढाणा शहर व जलंब पोलीस ठाणे हद्दीतील 2 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हातभट्टी दादा समाधान सिताराम पंडित (42) रा.अंत्रीतेली जि. बुलढाणा व वाळू तस्कर शेख शकील शेख शकूर (31) रा. माटरगाव ता.शेगाव जि. बुलढाणा असे आरोपींची नावे आहे.या आरोंपींना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.सध्या या आरोपींना बुलढाणा जिल्हा कारागृहात 3 आठवडे ठेवण्यात येणार असून, त्यानंतर हातभट्टी दादा समाधान सिताराम पंडित याला अकोला कारागृहात तर वाळू तस्कर शेख शकील शेख शकूरला येरवडा पुणे तुरुंगात स्थलांतरित करण्यात येणार आहे. सदर आरोपीला पकडण्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात हेपोकाँ संजय भूजबळ, पोकाँ मंगेश सनगाळे,सपोनि प्रताप भोज, पोकाँ रामेश्वर आंधळे, कौतिक बोर्डे, सपोनि अमोल सांगळे व टीम ने केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!