चिखली (हॅलो बुलडाणा) मा.आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच काँग्रेसला धक्का बसला आहे. तब्बल 20 ते 25 वर्षे काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपनगराध्यक्ष रफिकसेट यांनी मुंबईत थेट भाजपाचा झेंडा हाती घेतला. ‘हॅलो बुलडाणा’ ने ही ब्रेकिंग न्यूज सर्वप्रथम प्रसारित केली.
विशेष म्हणजे, राहुलभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर रफिकसेट यांनी चिखली शहरात लावले. काँग्रेसचा झेंडा हातात असताना अचानक भाजपात प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय? स्थानिक राजकारणात खळबळ उडवणाऱ्या या निर्णयामागे राजकीय दबाव आहे की नव्या संधीचा शोध?काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारा हा प्रवेश नेमका वाढदिवसाच्या एक दिवस आधीच का ठरवला गेला, यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. रफिक शेठ यांचे राहुलभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पोस्टर अजूनही चिखलीत झळकत आहेत.म्हणूनच राजकीय नाट्याचा नवा रंग! चिखलीत पहायला मिळाला आहे