spot_img
spot_img

महिंद्रा बोलेरो पिकप गाडीने घेतला एकाचा बळी! – देऊळघाट – अजिंठा मार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा! – ‘हॅलो बुलडाणा’ने रस्त्याच्या दुरावस्थेबाबत केले होते वृत्त प्रसारीत!

देऊळघाट (हॅलो बुलडाणा / इमरान खान) सुसाट वेगाने धावणाऱ्या एका महिंद्रा बोलेरो पिक अप गाडीने एकाचा बळी गेल्याची घटना 5 मे च्या संध्याकाळी उघडकीस आली आहे.जफर खान मुकद्दर खान (56) रा.देऊळघाट असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.विशेष म्हणजे या रस्त्याची दुरावस्था ‘हॅलो बुलढाणा’ने अनेक वेळा अधोरेखीत केली होती. देऊळघाट-अजिंठा महामार्गावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अजिंठा मार्गावरून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीने एका 56 वर्षीय व्यक्तीला मागून येत जोरदार धडक देऊन फरार झाला. ही घटना 5 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. देऊळघाट येथील रहिवासी जफर खान मुकद्दर खान वय 56 पाडळी येथून देऊळघाट येत असताना अजिंठा रोड वरून एका भरधाव बुलेरो पीक अप गाडीने या व्यक्तीला मागून जोरदार धडक दिली. धडक ऐवढी भीषण होती की,जफर खान मुकद्दर खान रोडवर उडून खड्ड्यात पडला. काही लोकांनी त्यांना उचलून तात्काळ एका खासगी रुग्णालयात भरती करून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केला. परंतू उपचार सुरू असताना डॉक्टरांनी नातेवाईकांना काही क्षणात डॉक्टरांनी त्यांची परिस्थिती फार गंभीर असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यात मार लागल्याने परिस्तिथी नियंत्रणात आली नाही आणि उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले.
देऊळघाट मार्गावर वाहने अतिवेगात धावत असल्याने वारंवार अपघात होत आहेत. वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे ही आता मोठी गरज बनली असून या गंभीर बाबीकडे संबधित यंत्रणेने लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!