बुलढाणा (हॅलो बुलडाणा) गेल्या मागील दोन वर्षात वृक्ष लागवड झाली नाही. 2025 मध्ये 26 हजार झाडांची लागवड होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु यापूर्वी केलेली वृक्ष लागवड आणि त्यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च गेला तरी कुठे? असा प्रश्न वृक्षप्रेमींना पडला आहे.
हे खरे आहे की, वृक्षारोपणाविषयी जागरुकता वाढत आहे. निमित्ताने लोकं झाडे लावू लागली आहेत. अनेक सामाजिक संस्था वृक्षारोपणासाठी पुढाकार घेताना आढळतात. पण कोणतेही झाड कुठेही लावून चालत नाही. त्याचेही काही नियम असतात. कोणती झाडे कुठे लावावीत यामागे काही तर्क असतात. आज मात्र केवळ ‘फोटोसेशन’साठी वृक्ष लागवड करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणजेच काय तर झाडे आपली मित्र. हो खरेच, वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्ष केवळ आपलेच जीवन प्रभावित करतात असे नव्हे, ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात. ‘हॅलो बुलढाणा’ची टीम या वृक्ष लागवडी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करायला गेली असता, ते म्हणाले की,2022 ते 23 व 2023 ते 24 दोन वर्ष वृक्ष लागवड नाही.2024 ते 25 मध्ये वृक्ष लागवड होणार आहे.
रस्त्यांच्या दुतर्फा 53 किलोमीटर 26 हजार झाडांची लागवड होईल. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन किलोमीटर मध्ये एक झाड असणार आहे.गट लागवडी मध्ये 43 हेक्टर मध्ये 47 हजार 773 झाडे लावण्यात येणार असे उद्दिष्ट यावर्षी करण्यात आले आहे.या आर्थिक वर्षात हे झाडांची वृक्ष मालिका पूर्ण होणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले. दरम्यान
2019- 20 व 21 या कालावधीमध्ये 33 कोटी झाडांची लागवड झाली होती. परंतु आता ही झाडे कमी आणि खड्डेच शिल्लक राहिल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
▪️जिल्हाधिकाऱ्यांनी हाती घेतली वृक्ष लागवडीची मोहीम!
जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी साडेचार लाख वृक्षांची लागवड करण्याची व वृक्ष मोफत वाटण्याची मोहीम सुरू केली.जिल्हाधिकारी मार्फत अधिकारी किंवा कर्मचारी यांना एक -एक झाड लावण्याचे व त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेण्याचे सांगण्यात आले आहे.