चिखली (हॅलो बुलडाणा) शहरातील पंचायत समितीच्या मागे असलेल्या भागात आज रात्री सुमारे 9 वाजता किरकोळ वादाचे रुपांतर थरारक चाकू हल्ल्यात झाले. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. शेख बासीद शेख खालील बागवान (वय 25), झुबेर शेख गणी बागवान (वय 35) आणि शेख गणी बागवान (वय 65) अशी जखमींची नावे असून, तिघेही एकाच कुटुंबातील आहेत.
आरोपी जाबाज शेख सुलेमान (वय 23, रा. पंचायत समिती मागे, चिखली) याने किरकोळ वादावरून संतप्त होऊन बासीद यांच्या घरात घुसून तिघांवर चाकूने सपासप हल्ला चढवला. या हल्ल्यात बासीद आणि गणी बागवान गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे हलवण्यात आले आहे.घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला