बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात आज अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांनी थैमान घातले. बसस्थानकासमोरील प्रशासकीय इमारतीजवळील दोन उंच झाडे प्रचंड वाऱ्यामुळे मुळासकट उन्मळून पडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.विशेष म्हणजे, या झाडांपैकी एक झाड थेट ऑफिस समोरील उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर कारवर कोसळले. कारचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने, कारमध्ये कुणीही नसल्याने जीवितहानी टळली.
- Hellobuldana