बुलढाणा (हॅलो बुलडाणा) येथील स्वर्गीय डॉ.अरुण नथुराव खासबागे यांना रक्तदान शिबिराने अभिवादन करण्यात आले.स्वर्गीय डॉ.अरुण नथुराव खासबागे यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 6 मे रोजी डॉ. खासबागे मल्टी स्पेशालिटी तळमजला येथे करण्यात आले होते.
‘रक्तदान श्रेष्ठ दान’ या सामाजिक दृष्टीकोनातून
प्रा. प्रेम खासबागे, ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर जोशी, महेश पंजाबी, हर्ष पंजाबी व गौरव मदान यांच्यासह अनेकांनी यावेळी रक्तदान केले. याप्रसंगी दलितमित्र माधवराव हुडेकर, हरिभाऊ पल्हाडे, आण्णा पवार, झाल्टे सर, सुभाष जाधव सर येळगाव, समाधान जाधव,सुरेश उबाळे नांद्राकोळी,
सुरेंद्र लहासे, शेजोळ,संजय खांडवे,सुरेश चौधरी साखळी, दिलीप निकम केसापूर,बिलारी केसापूर,डॉ. भागवत, डॉ.राहुल मेहत्रे,डॉ.राजेश जतकर,डॉ.संजय गवळी,डॉ. वृषाली गवळी, डॉ.गजेंद्र निकम,डॉ. झगडे,डॉ.राजेंद्र वाघ,डॉ.राजेश्वर उबरहंडे,डॉ.उमाळे,विधिज्ञ वाघ, साहित्यिक किसन वाघ,डी.एन. पाटील, रईस काझी, शिवाजी गवई, इंजिनीयर शेळके,पत्रकार हर्षनंदन वाघ, प्रा. सुचिता खासबागे,डॉ.वर्षा खासबागे, डॉ.आशिष खासबागे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता निर्मिक खासबागे, आर्यन खासबागे, कबीर खासबागे तसेच जीवनधारा ब्लड बँक चे भट्टड व संदीप तोरमळ यांचे सहकार्य लाभले.