बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील प्रखर सामाजिक कार्यकर्त्या जिजाताई राठोड-चांदेकर यांची राष्ट्रीय बंजारा परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड केवळ सन्मान नसून, त्यांच्या सामाजिक लढ्यांचे व सेवाभावी कार्याचे मोठे मूल्यांकन आहे. मागील अनेक वर्षांपासून महिलांचे हक्क, बालकांचे आरोग्य, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतमजुरांचे न्याय या मुद्द्यांवर आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या जिजाताईंनी समाजसेवा हीच आपली जीवनधारा मानली आहे.राष्ट्रीय बंजारा परिषदचे संपादक व धर्मनेता किसनभाऊ राठोड, प्रदेशाध्यक्ष सीमाताई राठोड, कार्याध्यक्ष निर्मलाताई जाधव व महाराष्ट्र प्रदेश सचिव उमेशभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात जिजाताईंना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या संघटन, हक्क व अधिकारांसाठीचा लढा अधिक व्यापक होण्यासाठी ही निवड मोलाची ठरणार आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपली स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या जिजाताईंच्या निवडीने संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाची लाट पसरली आहे. विविध समाजघटकांकडून आणि अप्तेष्टांकडून त्यांच्या निवडीचे जोरदार स्वागत होत असून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. जिजाताई राठोड-चांदेकर यांची ही निवड म्हणजे बंजारा समाजाच्या सशक्त नेतृत्वाची सुरुवात मानली जात आहे.