बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विधवा व एकल महिलांना सामाजिक प्रतिष्ठा, हक्क मिळवून देण्यासाठी बुलढाण्यात मानस फाउंडेशन कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून विधवा महिला संमेलन तथा पुनर्विवाह सोहळा 8 मे रोजी मलकापूर तालुक्यातील हरसोडा येथे आयोजित करण्यात आला आहे.
विधवा महिलांच्या सामाजिक, आर्थिक समस्या यावर परिसंवाद असून त्यावर प्रसंगी चिंतन मनन केले जाणार आहे. याबाबतची बैठक मलकापूर येथे नुकतीच घेण्यात आली. कार्यक्रमास जिजाऊ शिक्षण संस्था अध्यक्ष संतोष रायपुरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रायपुरे यांनी पुढाकार घेतला आहे व सर्व भार उचलला आहे. या कार्यक्रमाची माहिती होताच अनेक जोडपे यांनी नोंदणी केली. वधू-वरांना पंधरा हजाराचे भांडे, विमा दिला जात असून जोडप्यांना लग्नाचा कोणताही खर्च नाही.
▪️दोन्ही खासदारांची उपस्थिती !
विधवा महिलांच्या सामूहिक पुनर्विवाह सोहळ्याला बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व खासदार रक्षाताई खडसे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.तर वक्ते म्हणून सामाजिक क्षेत्रातील नामवंत आहेत. “तुम्ही लग्नाची तयारी दर्शवा..खर्च आम्ही करू” असे प्राध्यापक डी.एस. लहाने यांनी म्हटले आहे.जास्तीत जास्त जोडप्यांनी नोंदणी करण्याचे व सहभागी होण्याचे आवाहन लहाने यांनी केले आहे.