सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा) येथील ऐतिहासिक मोती तलावात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या युवकाची मात्र ओळख पटलेली नाही.
सिंदखेड राजा येथे मोती तलाव आहे.या मोती तलावात अनोळखी मृतदेह आढळून आला. हा मृतदेह जालना येथील युवकाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान मृतदेह तलावातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.