spot_img
spot_img

देऊळगाव राजा तहसीलचे रेतीत हात काळे! – एक गाडी सोडण्यासाठी पथक घेते 2 हजार, संतोष भूतेकर यांचा आरोप!

चिखली (हॅलो बुलडाणा/ एकनाथ माळेकर) संत चोखामेळा धरणाअंतर्गत खडकपूर्णा प्रकल्पातून बोटीद्वारे होणाऱ्या अवैध रेती उपसा विरोधात असंतोष कायम आहे. चिखली तहसील कर्तव्य बजावत असले तरी देऊळगाव राजा तहसील मात्र रेतीत हात काळे करीत असल्याचा आरोप होत आहे.

या अवैध रेती उपसा प्रकरणी युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी प्रशासनाला जागृत करण्यासाठी वेगवेगळे आंदोलने केली आहे.मात्र प्रशासन ढिम्म आहे. 21 एप्रिल 2025 रोजी संतोष भुतेकर यांनी जलसमाधी आंदोलनाची भूमिका घेतली होती. हे आंदोलन रोखण्यासाठी देऊळगाव राजा तहसीलला बैठक झाली. मात्र या बैठकीतून रेतीवर कायमस्वरूपी अंकुश लागलेला नाही. इसरूळ मार्गे होणारी अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी मंडपगाव, गारवा धाब्या जवळ कायमस्वरूपी चिखली महसुलचे पथक तैनात केले आहे.चिखलीच्या पथकाकडून व्यवस्थित कामगिरी सुरू सुद्धा आहे. इसरूळ मार्गे सध्या तरी 99% गाड्या बंदच आहेत परंतु एवढे करून रेती उपसा थांबला नाही. देऊळगाव राजा तहसील हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अजूनही जोमात रेती उपसा चालू आहे. धरण फाट्याजवळ कायमस्वरूपी देऊळगाव राजा तहसीलचे पथक तैनात असताना दहा-दहा गाड्या रेती घेवून चिखलीकडे हायवे वरून सुसार धावतात. 4 मे 2025 रोजी सायंकाळी तब्बल 40 -42 गाड्यांचा रेतीने भरलेला ताफा देऊळगाव मही कडून चिखलीला जाताना अनेक प्रत्यक्षदर्शींनी डोळ्यांनी पाहिला आहे. मग देऊळगाव राजाचे पथक नेमके करते काय? यासंबंधी संतोष भुतेकर यांनी खळबळ जनक आरोप करत देऊळगाव राजा महसूल प्रशासनावर तोफ डागली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार देऊळगाव राजा पथक प्रत्येक गाडीचे दोन हजार रुपये घेऊन गाड्या सोडत असते. सदर वाहतुकीमुळे सध्या तरी इमानदारीने काम करणाऱ्या चिखली महसूल ची विनाकारण बदनामी होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!