बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. बोर्डाकडून सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाबाबातची माहिती देण्यात येणार आहे. आज दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल (Maharashtra board 12th result date and time) ऑनलाइन पाहाता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्य मंडळाचा हा निकाल ‘https://results.digilocker.gov.in’ आणि ‘https://mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. राज्य मंडळाने यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करत नवा विक्रम केला आहे.
एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.