देऊळघाट (हॅलो बुलडाणा/इम्रान खान) देऊळघाट – अजिंठा मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून अपघाताच्या घटना नेहमीच्या झाल्या आहेत.आज ४ मे रोजी ११.०० वाजे च्या दरम्यन दुचाकी मारुती सुझुकीला भिडल्याने २ मुले जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
MH 386926 क्रमांकाची मारुती सुझुकी सेलेरो ही अजिंठा मार्गावरून बुलढाणाकडे येत असताना दुचाकी ट्रॅक्टरला ओव्हर टेक करत मारुती सुझुकीला भिडली. या अपघातात २ मुले गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहे,
अपघातची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.देऊळघाट मार्गाने वाहने सुसाट धावतात.अति वेगाने धावणाऱ्या वाहनांना ब्रेक मात्र लागत नाही, ही चिंतेची बाब असल्याची भावना व्यक्त केल्या जात आहे.