बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शेतकरी हिताच्या न्यायिक मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आंदोलनात्मक पवित्र घेतला असून,आज 2 मे रोजी बुलढाणा जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे.या मोर्चात सामील होण्याचे आवाहन शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केले आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासनांची खैरात केली होती परंतु दिलेली आश्वासने हवेतच विरली.कर्जमाफीझाली नाही सातबारा कोरा झाला नाही.विज बिल माफ झाले नाही.पिक विमा शेतीमालाला योग्य भाव सिंचन अनुदान व वन्य प्राण्यापासून संरक्षण यासारख्या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.या ट्रॅक्टर मोर्चाचे नेतृत्व शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके,आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत करणार असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
▪️अशा आहेत मागण्या..
1)संपूर्ण कर्जमाफीची त्वरित अंमलबजावणी व्हावी
2)सोयाबीन, कापूस, मका या सर्व शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा
3)शेतकऱ्यांना अटीशिवाय पिक विमा मिळावा
4)तुषार सिंचन व ठिबक सिंचनासाठी रखडलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे
5) वन्य प्राण्यांपासून शेतमालाचे संरक्षण व्हावे यासाठी तार कंपाऊंड द्यावे
6) शेतकऱ्यांसाठी वीज माफी करून मोफत वीज द्यावी
7)पाणीटंचाई आणि इतरही मागण्या पूर्ण कराव्यात