spot_img
spot_img

💥EXCLUSIVE ‘बोगस दिव्यांग प्रकरण भोवणार!’ गटशिक्षणाधिकारी आर.आर. पाटील यांच्यावर कारवाईची टांगती तलवार! – सुनावणी दरम्यान शिक्षणाधिकारी खरात यांचे कारवाईचे आश्वासन!

चिखली (हॅलो बुलडाणा) बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे चिखली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर आर पाटील यांनी लाखो रुपये घेऊन शिक्षण सेवकांना रुजू करून घेतल्याचा आरोप करीत मानव अधिकार संघटनेचे प्रशांत डोंगरदिवे यांनी आमरण उपोषण पुकारुन सखोल चौकशीची मागणी केली होती. दरम्यान शिक्षणाधिकारी खरात यांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यामुळे तूर्तास उपोषण मागे घेण्यात आले आहे.

प्रशासनाची दिशाभूल करून खोटे व बनावट दिव्यांग प्रमाणपत्र च्या आधारे पदवीधर शिक्षकाने आर्थिक व राजकीय पाठबळाचा वापर करून केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व गट शिक्षण अधिकारी पदावर विराजमान होऊन खऱ्या दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांच्यावर अन्याय केला आहे.अशा अधिकाऱ्याची रीतसर सखोल चौकशी होऊन गुन्हे दाखल करून कायम बडतर्फ करावे तसेच सन 2024 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत शासनाकडून नविन नियुक्त केलेल्या शिक्षण सेवक विहित मुदतीत नियुक्त केलेल्या शाळेवर रूजु न झाल्यामुळे रमेश रतन डुकरे पाटील,गटशिक्षण अधिकारी पं.सं. चिखली जि. बुलडाणा यांनी लाखो रूपये घेऊन शिक्षक सेवकांना नियमबाह्य रूजू करून घेतल्या प्रकरणी तात्काळ उच्च स्तरीय चौकशी करून संबंधीत शिक्षक सेवकांच्या नियुक्त्या रद्द करून गट शिक्षण अधिकारी रमेश रतन पाटील यांना तात्काळ कायमस्वरूपी बडतर्फ करणे बाबत भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा व मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. यांना निवेदनद्वारे केली होती परंतु कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे दि 30 एप्रिल 2025 रोजी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली होती.
सदर विविध सामाजिक नेते व कार्यकर्त्यांनी भेटी देऊन आपला पाठिंबा दिला होता. उपोषण मंडपास शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री खरात भेट दिली असता रमेश रतन डुकरे हे 30 जुलै 2010 रोजी जर सकाळी 10 ते 5 शाळेत होते तर त्यानी अपंगांचे प्रमाणपत्र आणले कुठून त्याच बरोबर त्यांना जर ऐकू येत नाही तर त्यांनी चार चाकी गाडी चालवण्याचे लायसन आणले कुठून बऱ्याच विषया संदर्भांत शिक्षणाधिकारी श्री खरात यांचे सोबत चर्चा होऊन शेवटी सोमवारी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये अजूनही बरेच विषय पुराव्यासह सादर करणार असल्याचे शिक्षणाधिकारी यांना सांगण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रमेश रतन डुकरे हे अवैद्य सावकारी करीत असून गोरगरीब शेतकऱ्यांचे जमिनी खरेदी करून घेतल्या असल्याच्या तक्रारी व चिखली तालुक्यातील एका शाळेतील महिला शिक्षिकाना पगारी रजा देऊन त्यांच्या जागी अल्प मानधनवर मुली शिक्षिका ठेऊन विध्यार्थीचे शिक्षण धोक्यात आणले व त्या पगारी शिक्षकांकडून मोठी रक्कम घेऊन शासनाच्या डोळ्यात धूळ फेकणे या सह इतर विषय मांडणार असल्याचे उपोषण कर्ते यांनी सांगितले. संबंधित गट शिक्षण अधिकारी यांनी आपल्या तक्रारी संदर्भात आठ दिवसात खुलासा द्यावा सदर खुलासा न दिल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी जि प बुलडाणा यांच्या समोर सुनावणी ठेवण्यात येईल तक्रारकर्त्यांच्या तक्रारीत नमूद सर्व पुराव्यासह संबंधितचे म्हणणे एकूण पुढील कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने व सम्राट सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आशिष बाबा खरात, वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे, राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंच चे अध्यक्ष अंबादास घेवंदे, वंचित शहर महासचिव, विजय राऊत, दिलीप राजभोज, राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंच चे अध्यक्ष अंबादास घेवंदे यांनी जाहीर पाठींबा दर्शवीला होता. यांच्या मध्यस्थीने भारतीय मानवाधिकार संघटनेचे प्रशांत डोंगरदिवे यांचे आमरण उपोषणास तूर्तास स्थगित करण्यात आले. यावेळी भारतीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा महासचिव संदिप गवई, जिल्हा उपाध्यक्ष आदिल पठाण, बुलडाणा तालुका अध्यक्ष संदिप बोर्डे, चिखली उपाध्यक्ष प्रकाश भराड, तालुका सल्लागार विरसेन साळवे, भाई गौतम खरात हे उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!