चिखली/बुलडाणा (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल)दि. 30 एप्रिल 2025 – केंद्र सरकारने सादर केलेल्या वक्फ संशोधन विधेयक 2025 विरोधात आज मुस्लिम समाजाचा संताप रस्त्यावर उतरला. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या हाकेला प्रतिसाद देत चिखली व बुलडाणा शहरात मुस्लिम बहुल वस्ती, मशिदी आणि बाजारपेठांमधील घरं, दुकानं, हॉटेल्स, कार्यालये अशा सर्वच ठिकाणचे दिवे रात्री 9 वाजता ठरल्याप्रमाणे एकाचवेळी बंद करण्यात आले. शहर अंधारात गेलं… पण या अंधारात संतप्त आवाज घुमू लागले – ‘वक्फ बोर्डावर हस्तक्षेप नको’, ‘आमच्या हक्कांवर गदा नको!’या आंदोलनात समाजाच्या प्रत्येक घटकाचा स्वयंस्फूर्त सहभाग दिसून आला. वयोवृद्ध, व्यापारी, युवक, विद्यार्थी – सगळ्यांनी एकजुटीने आपला विरोध नोंदवला. प्रशासन पूर्णपणे अडचणीत आले असतानाही आंदोलन शांततेत पार पडले, मात्र या शांततेतून निर्माण झालेला दबाव प्रचंड होता. अनेकांनी सांगितले की, वक्फ मालमत्तेवर सरकारचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, आणि हे विधेयक म्हणजे धर्मिक स्वायत्ततेवर आघात आहे.
या आंदोलनाचे पडसाद फक्त चिखली व बुलडाण्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभर उमटले. मुस्लिम समाजाच्या या संघटित प्रतिक्रियेने केंद्र सरकारपुढे गंभीर प्रश्न उभा केला आहे