spot_img
spot_img

जिल्हा परिषदेच्या विश्वासाचा सन्मान; Pahel Institute ची मोठी भरारी! ‘मिशन झेड’ अंतर्गत २५ विद्यार्थ्यांना NEET, JEE व CET साठी मोफत कोचिंग

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) शासकीय शाळांतील गुणवत्ताधारित आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी जिल्हा परिषदेच्या ‘मिशन झेड’ उपक्रमांतर्गत बुलडाण्यातील Pahel Institute, चैतन्यवाडी ची अधिकृत निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत २५ निवडक विद्यार्थ्यांना NEET, JEE व MHT-CET परीक्षांसाठी मोफत दर्जेदार मार्गदर्शन मिळणार आहे.या निवडीसाठी आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गुलाबराव खरात, शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, योजना शिक्षणाधिकारी ठग मॅडम, BDO पवार मॅडम, गटशिक्षणाधिकारी खंदारे मॅडम आणि केंद्र संचालक मेमाणे मॅडम आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

Pahel Institute चे संचालक प्रा. निखिल श्रीवास्तव सर यांनी जिल्हा परिषदेच्या विश्वासाबद्दल आभार मानत सांगितले, “विद्यार्थ्यांचे यशच आमचा खरा पुरस्कार आहे.” त्यांनी उत्कृष्ट शिक्षण सुविधा आणि मार्गदर्शनाची हमी दिली.संस्थेचे व्यवस्थापक सिद्धेश्वर मंडळकर सर यांनी पालकांच्या सर्व शंकांचे समाधान केले. प्रमुख मार्गदर्शक शिक्षक म्हणून प्रा. प्रविण रोकडे, आर. आर. शेख, कृष्णा काळवघे, विठ्ठल दवंड व चेतन प्रधान सर यांचा मोलाचा सहभाग राहिला.कार्यक्रमाच्या अखेरीस श्री. हिवाळे सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व प्रशासनाचे आभार मानले. Pahel Institute तर्फे विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क: 9763009156 / 9766924900

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!