बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आ. संजय गायकवाड यांनी पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले परंतु बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. या प्रकरणाचा आ. गायकवाड यांनी मागील दोन वेळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु प्रशासनाकडून कारवाई संथगतीने सुरू असल्याचे चित्र असून या प्रकरणात नाममात्र कारवाई व भ्रष्टाचारातून जमवलेली करोडो रुपयांची चल-अचल संपत्ती शासनजमा करण्यात आली नाही. त्यात फक्त बहुचर्चित भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे राहणार अकोला यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणातील काही आरोपी राजरोसपणे फिरत आहे.या भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपींवर त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी पावसाळी अधिवेशना दरम्यान जोर धरू लागली आहे.