spot_img
spot_img

संग्रामपूरमध्ये अपंग दाम्पत्यावर लाथाबुक्कीचा हल्ला!

पंचाळा/ संग्रामपूर (हॅलो बुलडाणा)  गावातील प्रगती अपंग बचत गटाच्या अध्यक्षेवर रात्रीच्या सुमारास दारुड्या अजय बांगर याने घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

सौ. मनिषा राजेश नेमाने (वय ३५) व त्यांचे पती राजेश रामराव नेमाने हे दोघेही जन्मतः अपंग असून समाजसेवेच्या कामात सक्रिय आहेत. काल रात्री २ वाजता अजय बांगर हा त्यांच्या घरासमोर येऊन दरवाज्याला जोरजोरात लाथा मारत अश्लिल भाषेत शिवीगाळ करू लागला. विरोध केला असता अजयने मनिषा व राजेश नेमाने यांना घाणेरडे अपशब्द वापरत बचत गटाचे पैसे हडपल्याचा आरोप करून धमकावले. इतक्यावरच न थांबता त्याने राजेश नेमाने यांना कानशिलात मारली व उघड्या धमक्यांची बरसात केली.

घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील भगवान खांजोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अजयने काही वेळ शांतता राखली मात्र नंतर पुन्हा येऊन पीडित दाम्पत्याला धमकावले. या प्रकरणी सौ. मनिषा नेमाने यांनी संग्रामपूर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अजय बांगर विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास पीएसआय विलास बोपटे यांच्याकडे सोपवला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!