spot_img
spot_img

तिजोरी लुटणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले! – आमदार सिद्धार्थ खरात आणखी काय म्हणाले?

मेहकर (हॅलो बुलडाणा) सोयाबीन, कापूस, तूर उत्पादक शेतकऱ्यांनी मतदान करून ज्यांना मंत्री बनवले त्यांनीच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.तिजोरी लुटणाऱ्या सत्ताधारी सरकार मधील एकही मंत्री यासंदर्भात बोलत नाही.केवळ सुलभा खोडके बोलल्या आहेत,असा हल्लाबोल आमदार सिद्धार्थ खरात यांनी सभागृहात केलाय.

स्वत:मध्ये मश्गूल असलेल्या सरकारला शेतकरी बांधव त्याच्या जीवनातल्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे याची साधी जाणीवही नाही. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना टोकाची भूमिका घेण्यास भाग पडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील,असेही ते म्हणाले. शेतीत उत्पादन खर्च अधिक होत असल्याने दराअभावी फारसे शिल्लक राहत नाही. शेतीमालाच्या हमीभावाबाबत ठोस निर्णय व्हायला हवा.आज शेतकऱ्यांच्या घरात अर्धी अधिक सोयाबीन पडलेले आहेत. मालाला भाव नाही.त्यांनी आपल्या मुला मुलीचे लग्न किंवा इतर खर्च कसा भागवावा? हा गंभीर प्रश्न आहे.याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!