शेगाव (हॅलो बुलडाणा) शेगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील लासुरा गावाजवळील अरविंद आभारी यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत आज सकाळी एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून, ओळख पटविणे कठीण झाले आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लासुरा गावातील युवक गोपाळ ठाकरे हा काही दिवसांपासून बेपत्ता होता. सध्या आढळलेला मृतदेह त्याचाच असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला या मृत्यूमागे अपघात, आत्महत्या की घातपात, याबाबत साशंकता व्यक्त होत असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता आहे. संपूर्ण घटनेने संपूर्ण लासुरा गाव हादरून गेले आहे.