spot_img
spot_img

केळवद फाट्याजवळील अपघातातील आणखी एक बळी; गजानन आडवे यांचे उपचारादरम्यान निधन

चिखली (हॅलो बुलडाणा) केळवद फाट्याजवळ  20 एप्रिल रोजी घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. कार आणि दुचाकी यांच्यातील जबर धडकेत शिक्षक पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील तिसरा जखमी, गजानन आडवे (रा. माळविहीर) याचा देखील आज (२५ एप्रिल) संध्याकाळी मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते. मात्र, सर्व उपचार निष्फळ ठरले आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातात मरण पावलेले गणेश गायकवाड व उषा गायकवाड हे पती-पत्नी होते. त्यांच्या मृत्यूनंतर आडवे यांचाही मृत्यू झाल्याने माळविहीर गावात शोककळा पसरली आहे.

या घटनेमुळे केळवद फाट्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्ट होते. स्थानिकांनी या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!