चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत किन्होळा येथे एकाला क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याची घटना 23 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. निलेश पंजाबराव धंदर रा. कोलवड,यश रवींद्र जाधव रा. कोलवड,गणेश सदाशिव पंडित रा. बुलढाणा अशी या आरोपींची नावे आहेत.
फियार्दी सतीश व्यंकटराव बाहेकर (51) रा. किन्होळा हे 21 एप्रिल रोजी ब्रह्मपुरी तालुका चिखली येथे कार्यक्रमात गेले होते.तिथे साडेसात वाजता निलेश पंजाबराव धंदर रा. कोलवड हे भेटले असता दोघात काही बोलचाल झाली. यावेळी सतीश व्यंकटराव बाहेकर हे गावी निघून गेले.22 एप्रिल रोजी सतीश व्यंकटराव बाहेकर बुलढाणा येथे लग्न कार्यक्रमात आली असताना, अण्णा अनिल दामोदर म्हस्के यांचा फोन आला होता.त्यांनी आमच्या माणसाला त्रास का देता म्हणून जाब विचारला होता.दरम्यान रात्री अकरा वाजता च्या सुमारास किन्होळा येथे घरी येऊन तिघा आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वीट मारून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार दिल्याने तीघां आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.