बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शासकीय लाभ सहजासहजी मिळत नाही.हात पाय शाबूत नसलेल्यांना देखील सरकारी उंबरठे झिजजावे लागतात.मोठ्या ‘दिव्या’तून गेलेल्यांना एखादा लाभ मिळतो.परंतु हा लाभ ही औटघटकेचा ठरतो.असे उदाहरण जिल्हा सामान्य रुग्णालयात नेहमीच पाहायला मिळते. येथे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटण्याचा धंदा सर्वश्रूत असला तरी,दिव्यांगांना वाटण्यात आलेल्या सायकली सुद्धा निकृष्ट दर्जाच्या निघाल्या आहेत.एका दिव्यांगाच्या व्हीलचेअरचे चाक अक्षरशा निखळून पडल्याने दिव्यांगांच्या वेदना आणि रुग्णालय प्रशासनाचे उदासीन धोरण समोर आले आहे.बरे झाले भाजपा नेता मुन्ना बेंडवाल यांनी सदर रुग्णाच्या सायकलीचे निखाळलेले चाक बसवून देऊन त्यांना मदत केली.
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय भ्रष्टाचारासाठी कू प्रसिद्ध आहे. रुग्णालयात तेरा तालुक्यातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात.परंतु त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही. शिवाय येथे दिव्यांग प्रमाणपत्र पैसे घेऊन सहज मिळते असा आरोप होतोय. मात्र वरिष्ठ यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे दुर्लक्षित आहेत. राज्यातील ३५९ जणांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकऱ्या मिळवल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले होते. संबंधितांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या प्रमाणपत्रांचीही पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. या सर्वांची यादी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात आली होती.मात्र माशी कुठे शिंकली हे सध्या तरी कळायला मार्ग नाही.त्यामुळे सरकार व प्रशासकीय यंत्रणा दिव्यांगांसोबत खेळत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.