देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) रागाच्या भरात आजकालची पिढी काय करेल सांगता येत नाही. वडिलांनी मोबाईल हिसकावून घेतल्याने एका 17 वर्षीय मुलाने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे.देऊळगाव राजा तालुक्यातील जवळखेड येथे ही घटना घडली.
देऊळगाव राजा तालुक्यातील अनिकेत तुळशीदास अवघडराव (17 हा नुकतीच बोर्डाची परीक्षा पास करून तो 11 व्या वर्गात महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. 23 एप्रिल रोजी दुपारी वडिलांनी हातातील मोबाईल
हिसकावला त्यामुळे वडिलांनी हातातील मोबाईल हिसकावला याचा मनात राग धरून अनिकेत याने रागाच्याभरात घरातील छताला गळफास लावून जीवन संपवले. सदर घटना सायंकाळी 5 वाजे सुमारास उघडकीस आली. नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात अनिकेतला दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस पुढील तपास करीत आहे.