बुलडाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था संघाच्या अध्यक्षपदी राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. सलग सातव्यांदा त्यांनी हा मान पटकावला असून त्यांच्या नेतृत्वातील विजयी रथ अजूनही अडथळ्यांशिवाय धावतो आहे.संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकाही पदावर विरोध न झाल्याने संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक श्री. जी. जे. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया शांततेत पार पडली.
11 मार्च 1991 रोजी स्थापन झालेल्या या संघाच्या अखत्यारित 320 पतसंस्था आहेत. या संघाच्या नेतृत्वात भाईजी यांनी संघाला राज्यात एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या दूरदृष्टीने आणि कार्यक्षमतेने बुलडाणा जिल्हा पतसंस्था संघ आज राज्यात अग्रगण्य मानला जातो.निवडणुकीत सौ. स्वाती वाकेकर यांची उपाध्यक्षपदी, तर श्री. सुरेन्द्रप्रसाद पांडे यांची मानद सचिवपदी एकमताने निवड झाली. संचालक मंडळात श्री. गोविंद मापारी, श्री. पंडितराव देशमुख, श्री. मंगेश व्यवहारे, श्री. मख्खनलाल मुंदडा, सौ. स्वाती कन्हेर, श्री. शंकर सकळकर, श्री. दीपक देशमाने, श्री. सतीश कायंदे यांचा समावेश झाला.निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभात निर्णय अधिकारी आमले यांनी सर्व नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.