spot_img
spot_img

💥इम्पॅक्ट! ‘हॅलो बुलडाणा’ च्या दणक्याने शिक्षण विभागाला जाग! – वृत्त उमटताच.. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र कारवाई संदर्भातील पत्र जारी! – बोगस दिव्यांग शिक्षक यंत्रणेच्या रडावर!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) “बोगस दिव्यांग प्रमाणपत्र लाटणाऱ्यांची यादी ‘हॅलो बुलढाणा’च्या हाती!” या मथळ्याखाली ‘हॅलो बुलढाणा’ ने प्रकाशझोत टाकताच शिक्षण विभागाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात कारवाईचे पत्र काल जारी केले आहे.

जिल्हा परिषद यंत्रणेतील सुज्ञ शैक्षणिक विभाग अर्थपूर्ण दप्तर दिरंगाई करत आहे.जिल्ह्यात शेकडो शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे हवा तो लाभ लाटल्याने खऱ्या दिव्यांगांना न्यायाची प्रतीक्षा आहे.दरम्यान सर्वच शिक्षकांच्या बदली प्रक्रिया व पदोन्नतीसाठी देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी सक्षम प्राधिकरण म्हणजे जे जे हॉस्पिटल मुंबई व तत्सम प्राधिकरणाकडून पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असताना ती केल्या गेली नसल्याने जिल्ह्यात बोगस प्रमाणपत्रांची खैरात वाटल्याची साशंकता बळावली आहे.
जिल्हा परिषद तसेच प्राथमिक शिक्षण
विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन अनेकांनी नोकरी बळकावली तसेच बदली प्रक्रिया व पदोन्नतीसाठी दिव्यांग प्रमाणपत्राचा
सर्रास वापर होत असल्याची तक्रार
वारंवार दिव्यांग संघटने कडून तसेच विविध संघटने कडून प्रशासनाकडे केली जात आहे परंतु या बाबतीत अद्यापही तोडगा निघत नसल्याने खऱ्या दिव्यांगाना न्याय कधी मिळणार? हा प्रश्न अनुत्तरीत असल्याचे ‘हॅलो बुलढाणाने ‘ रोखठोक वृत्त प्रसारीत केले होते..जिल्ह्यातील दिव्यांग,दुर्धर आजारी शिक्षक व त्यांच्याशी संबंधित नातेवाईकांची मुंबईच्या जेजे हॉस्पिटल येथे फेर तपासणी करण्यात यावी, व याच हॉस्पिटलच्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी,अशी मागणी रेटली होती. दरम्यान 22 एप्रिल रोजी शिक्षण विभागाने या संदर्भातील कारवाईचे पत्र जारी केले आहे. त्यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक शिक्षक यंत्रणेच्या रडावर आले आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!